तू होतीस
तेव्हां जगच माझं वेगळं होतं
ते सुखच खरं कस आगळं होतं
आता मात्र
काळोख्या वाटेवर एकटाच चालतोय
मात्रा हरावल्यासारखा असा एकेरीच जगतोय
कधीतरी
दुरवर एखादा प्रकाश दिसतो
सोनेरी आशेचा तो एक किरणच वाटतो
भिती वाटते तरीही
अंधाराला सरावलेल्या दोळ्यांना
शांततेला स्थिरावलेल्या कानांना
काय असेल तिथे
डोळे सुखावणारं खुलं आकाश
कि ते दिपवणारा पिवळा प्रकाश
कधी वाटतं
आता तरी एकदा धीर करुयाच
काय आहे पालिकडे बघुयाच
बघुया तर खरं
मिळालच आकाश तर पंख लावून उडुया
नाहीतर पुन्हा एकदा दूर प्रकाशाला शोधुया
gazal
Sandeep i dint get you
तुला असा म्हणायचय का की ही कविता गझल सारखी वाटते?
nice…is it from real relationship or tujhee fakta vichar aahet//??
i am not a great poet
so far i could only pen down thing which i’ve been through…