गौरी, अगं हे कारण असू शकतं का नकार देण्याचं?
मला पटतं, तू तुझ्या आई बाबांना पूर्ण ओळखतेस, त्यांना हे सगळं नाही चालणार.
ते विरोध करतील. कल्पना आहे मला त्याची.
अगं पण त्या विरोधाला सामोरं जायची तयारी आहे माझी.
पण जर तूच साथ दिली नाहीस तर…
तर माझ्यात ते धाडस, तो आत्मविश्वास कसा येइल?
अग हो, तुला नाही बोलता येणार तुझ्या आई वडिलांच्या मनाविरुद्ध अणि तशी माझी अपेक्षाही नाही.
मी बोलतो तुझ्या बाबांशी. कल्पना देतो त्यांना आपल्या प्रेमाची.
पटवून देतो त्यांना आपण नाही राहू शकत वेगळं. हो… तुला नाही आवडणार जर त्यांनी माझा अपमान केलेला.
अगं, पण मी सहन करीन तो.
प्रेम केले आहे आपण… आता ते मिळवायला झटायला ही लागणार!
त्याला ही नाही घाबरत मी. कोणाचही मन वळवेन गं गौरी मी.
पण माझा विश्वास माझा आधार तूच आहेस गं, गौरी तूच.
तूच असा धीर सोड्लास तर… तर मी खंबिरपणे कसा उभा राहू?
गौरी पाच वर्ष ओळखतो आपण एकमेकांना. स्वतःला ओळखत नसू तेव्हढे एकमेकांना ओळखतो.
अगं प्रेम आहे आपलं जीवापाड एकमेकांवर.
असं असताना तू एखाद्याबरोबर पंधरा मिनिटांच्या ओळखीवर फक्त आई वडिलांच्या पासंतीवर विश्वास ठेवून उरलेलं सगळं आउष्य काढणार आहेस?
अगं पळून जाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्याय नाही आहे का? अगं तेव्हढं सोपं असतं का ते?
अगं सगळ्याची तयारी आहे तुझी, ठीक आहे. पण जरा आई बाबांचा विचार कर ना.
केव्हढं वाईट वाटेल त्यांना, कि आपली मूलं आपल्या मनाविरुद्ध वागत आहेत हे बघून.
हो ग त्यांनीही करायला हवा आपल्या मनाचा विचार, कबूल आहे.
अगं पण हेच तर त्यांना पटवून देऊ आपण. गौरी तू फक्त माझ्या हातात तुझा हात दे…
माझ्या बरोबर उभं राहून विश्वासानं साथ दे.
उद्याचा दिवस नक्की आपला असल गौरी … नक्कीच!!