मित्रांची फोनाफोनी
प्रत्येकाची वेगळी बहाणी
हो नाही म्हणत जमले आठ
साजरी करायला नववर्ष पहाट
भेटायची जागा दादर टिकिट घर
उशीर करण्यात सगळ्यांचाच कहर
अखेर साडेनऊला मंडळी हलली
अख्खी दादर चालत फिरली
सुरवातीला थोडी भेळ खाल्ली म्हणुन बरं
नाहीतर भूकेपोटी कोणाचच नव्हतं खरं
गर्दी नको अन खर्चही नको खिशाला
असं होतं तर दादरमध्धे फिरलोच कशाला
दादरकरांची मराठ्मोळी पद्धत सगळ्यांना चांगलीच कळली
आणि शेवटी मंडली चर्चगेटकड़े वळली
चर्चगेट फास्ट पकडताना झाली चूकामुक
मागे रहिलेल्यांची वाट बघत वाढली भूक
साडे अकराची वेळ आम्ही हॉटेल सत्कार गाठलं
बंद करायचय म्हणत त्यांनी बाई थोडसच वाढलं
मरींन ड्राइव तर अजून लांबच राहिला
बाराचा ठोका आम्ही हॉटेलातच पाहिला
एसेमेस वाचणं आणि फोरवर्ड करणं
मधुनचं उगाचच फोटो क्लीक मारणं
सगळ्यांनी रात्र मरींन ड्राइववर काढायच ठरलं
मी आणि माझा बुडं मात्र परत फिरलं
मस्तित झिंगलेली तरुणाई
माला शेवटची लोकल पकडायची घाई
आनंदाने मस्तीमध्धे परतणारी गर्दी
त्यांच्यावर लक्ष ठेवायला पोलिसांची वर्दी
नेहमी सारखचं लोकलमध्धे कोणाचं तरी वाजलं
“पेहेले दिन तो मत झगडो!!”, म्हणत एकाने समजावलं
कुर्ल्याला शेवटची पनवेल पकडून जीवात जिव आला
माझा न्यू इयर तर साला असा झक्कास साजरा झाला